पावसाचा निबंध




नागराज मंजुळे यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली जवळपास 25 मिनीटांची शॉर्टफिल्म आहे. नागराजने बऱ्याच गोष्टीवर फिल्ममध्ये फोकस केलाय. विषयाचा कालसुसंगतपणा बघितला तर तर एक बाब समजते. कोरोना महामारीमध्ये शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा उपाय म्हणून, सरकारने 'ऑनलाईन शिक्षण' राबवण्याचा प्रयत्न करतयं. ही फिल्म बघण्याच्या आधी काहीच नसल्यापेक्षा 'ऑनलाईन शिक्षण' सुरू ठेवणं बरोबर मानत होतो. परंतु, विश्वासच उडाला. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी मोबाईल किंवा टॅब असणं महत्वाचं नाहीये. त्याअनुषंगाने अनेक प्रश्न घरामध्ये आहेत. शेवटी प्रश्न पडला की शिक्षण तर सर्वांचा हक्क आहे. मात्र, आपल्या व्यवस्थेत तो सगळ्यांना मिळेलचा असा नाही.


सुरूवातीपासून शेवटपर्यंत कसलाच कृत्रिमपणा जाणवत नाही. सुधाकर यक्कंटी रेड्डी यांच्या दर्जेदार सिनेमॅटोग्राफीला शॉर्टफिल्ममध्ये पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. निर्माती गार्गी कुलकर्णी यांनी स्वतः यात मुख्य भूमिका बजावली आहे. फिल्ममधील डायलॉग त्यांच्या तोंडी परफेक्ट बसलेत. दारुड्या पुरुषामुळे घरातील कर्त्या महिलेची होणारी फरफट नागराजने सर्वांना समजेल अशा व्हीजवल्सने दाखवली आहे. पाऊस फील करायचा असेल तर त्यासाठीही फिल्म बघायला हरकत नाही..!

"निसर्ग सौंदर्याची खान असलेल्या स्वर्गीय जागेमध्ये आपण जन्मलो आहोत. त्यामुळे पाऊस या विषयावर निबंध लिहावा, जर नाही लिहिला तर संपूर्ण निसर्ग सौंदर्याचा अपमान असून आपल्याला जगण्याचा अधिकार नाही." असं प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना बजावत असतो. यातल्या ..'तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही' या वाक्याचा उलगडा फिल्ममध्ये होतो.
पायवाट लघुपटातील दृश्य


त्याचप्रमाणे पायवाट आणि बिबट्या या दोन शॉर्टफिल्म सुद्धा बघायला हव्यात. तिन्ही लघुपटांचा समान धागा म्हणजे, कुटुंबाचे अर्थकारण मोल मजुरीवर अवलंबून आहे.

(सूचना - एयरफोन्स वापरुन फिल्म बघितली तर मजा येईल, सध्या झीफाईव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध)

Comments