Posts

Showing posts from July, 2021

'द ग्रेट इंडियन किचन'

Image
माणूस हा डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, वैज्ञानिक असो किंवा उच्चशिक्षण घेऊन कुठल्याही हुद्द्यावर काम करत असो. तो तथाकथीत संस्कृती आणि परंपरेच्या विळख्यात अडकलेला आहे. माणसातला पुरूष घटक हा अहंकारी असतो. त्याच्या विचारात लवचिकता जाणवत नाही. त्याला बायकोने सांगितलेले ‘मॅनर्स’ चालत नाहीत. स्वत:ची चूक असूनही त्याला बायकोकडून सॉरी हवं असत. आपला दिवस कसा निघून जातो? हे कळत नाही. पण त्या कालावधीत जर पदोपदी अन्याय होत असेल तर ‘कळतच नाही’ हे उत्तर अपेक्षीत नाही. काही स्त्रिया उच्चशिक्षण घेऊनही रांधा, वाढा अन् उष्टी काढा अशी काम करतात. तेव्हा कळत त्याग आणि संयम शब्दाचा अर्थ. ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा मल्याळम भाषेतील 100 मिनिटांचा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शीत झाला आहे. शबरिमाला मंदिरात महिलांचा प्रवेश या तथाकथीत वादग्रस्त विषयामुळे हा चित्रपट तब्बल तीन महिने लांबणीवर पडला होता. लेखक आणि दिग्दर्शक जोयो बेबी यांनी चित्रपट दिग्दर्शीत केला असून, अभिनेता सुरज वेंजरमुडू आणि अभिनेत्री निमीशा सजयन यांनी मुख्य भूमीका पार पाडली आहे. आयएमडीबी रेंटी 8.4 असलेला हा चित्रपट शांघाई फिल्म महोत्...