'जस्ट मर्सी' : न्याय आणि मुक्तीची गोष्ट
जस्ट मर्सी सामान्यांसाठी लढणारा जगप्रसिद्ध वकील ब्रायन स्टेवन्सन यांच्यावर आधारीत 'जस्ट मर्सी' इंग्रजी भाषेतील हा चित्रपट. ज्या कैद्यांना मृत्यूची शिक्षा दिलेली असते, ज्यांची बाजू मांडायला कुणी धजावत नाही अशांची केसस्टडी करून निर्दोष असतील तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ब्रायन गेले 40 वर्षे झालं करत आहे. ही स्टोरी ब्रायनने लिहिलेल्या 'जस्ट मर्सी : अ स्टोरी ऑफ जस्टीस अँड रिडम्शन' पुस्तकावर आधारीत आहे. डेस्टीन डॅनियल क्रेटन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ब्रायन रेग्यूलर वकीलांप्रमाणे केसेस घेऊन पैसे कमावण्याच्या मागे न पडता, निर्दोष कैद्यांच्या न्यायासाठी लढा देतो. ब्रायनच्या भूमीकेमध्ये अभिनेता मायकेल जॉर्डन याने अभिनय केला आहे. तर ज्या निर्दोष कैद्यासाठी (वॉल्टर मॅकमीलन) ब्रायन लढतो, त्याची भूमीका अभिनेता जेमी फॉक्सने साकारली आहे. वॉल्टर एक सामान्य कृष्णवर्णीय कुटुंबातील कुटुंब प्रमुख. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत संसार करत होता. तो जंगलात लाकूड तोडीचं काम करत होता. मात्र, 1987 ला 18 वर्षाच्या मुली...