'जस्ट मर्सी' : न्याय आणि मुक्तीची गोष्ट
![]() |
| जस्ट मर्सी |
सामान्यांसाठी लढणारा जगप्रसिद्ध वकील ब्रायन स्टेवन्सन यांच्यावर आधारीत 'जस्ट मर्सी' इंग्रजी भाषेतील हा चित्रपट. ज्या कैद्यांना मृत्यूची शिक्षा दिलेली असते, ज्यांची बाजू मांडायला कुणी धजावत नाही अशांची केसस्टडी करून निर्दोष असतील तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ब्रायन गेले 40 वर्षे झालं करत आहे. ही स्टोरी ब्रायनने लिहिलेल्या 'जस्ट मर्सी : अ स्टोरी ऑफ जस्टीस अँड रिडम्शन' पुस्तकावर आधारीत आहे. डेस्टीन डॅनियल क्रेटन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ब्रायन रेग्यूलर वकीलांप्रमाणे केसेस घेऊन पैसे कमावण्याच्या मागे न पडता, निर्दोष कैद्यांच्या न्यायासाठी लढा देतो.
ब्रायनच्या भूमीकेमध्ये अभिनेता मायकेल जॉर्डन याने अभिनय केला आहे. तर ज्या निर्दोष कैद्यासाठी (वॉल्टर मॅकमीलन) ब्रायन लढतो, त्याची भूमीका अभिनेता जेमी फॉक्सने साकारली आहे. वॉल्टर एक सामान्य कृष्णवर्णीय कुटुंबातील कुटुंब प्रमुख. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत संसार करत होता. तो जंगलात लाकूड तोडीचं काम करत होता. मात्र, 1987 ला 18 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनवलं. वॉल्टरला त्याच वर्षी ज्यूरीने मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावली गेली. 'वर्णद्वेष' हे मुख्य कारण होतं ज्यामुळे वॉल्टरला या प्रकरणात गोवण्यात आलं.
ब्रायन सहकारी वकील ईवा अॅन्सेसोबत (भूमीका साकारणारी अभिनेत्री ब्रे लार्सन) काम करून खटला लढवतो. अमेरिकेतले सर्वात मोठे कारागृह अलाबामा येथे आहे. तेथील 'डेथ रो जेल'मध्ये वॉल्टर 6 वर्षापासून कैद असतो.
ब्रायन सरकारी वकिलाची भेट घेऊन या केसवर पुन्हा खटला चालवण्यासाठीची चर्चा करत असतो. यात तो वकील ब्रायनला म्हणतो, न्यायालयाचा आदर केला पाहिजे. हत्या झालेल्या पीडीतेच्या घरच्यांनाही न्याय मिळाला आहे. पुन्हा ही केस चालवायची म्हणजे लोक नाराज होतील. यावेळी ब्रायन त्या वकिलाला म्हणतो, "It isn't my job to make people happy. Its to achieve justice for my client."
वर्णद्वेष : ताजं उदाहरण
25 मे 2020 ला 46 वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडचा एका गोऱ्या पोलिसाने नरड्यावर गुडघा टेकवून हत्या केली. कारण काय तर, जॉर्जने 20 डॉलरची खोटी नोट दुकानादाराला दिली. आता हे कारण पोलिसांनी सांगितलयं. मात्र तो ज्या हॉटेलमध्ये बॉऊन्सर म्हणून काम करत होता, तो हॉटेल मालक म्हणाला की, जॉर्ज कुणाची फसवणूक करू शकत नाही. माझा त्याच्यावर पुर्ण विश्वास आहे. तरिही पोलिसांचं कारण मान्य केलं तर खोट्या नोटेचं केवळ निमित्त होतं. मुद्दा हा वर्णद्वेषाचा आहे. जॉर्ज त्या व्हिडिओमध्ये ओरडतोय की, 'आय कांट ब्रीद तब्बल' 'आय कांट ब्रीद' तरीसुद्धा गोरा पोलीस जॉर्जची मान 8 मिनिटे आणि 46 सेकंद गुडघ्याने दाबतो. सहा मिनिटांनंतर जॉर्ज दम सोडतो. तरिही हा पोलीस त्याच्या मानेवरचा गुडघा काढत नाही. वर्णद्वेष हा कायद्याच्या रक्षकांमध्येच असेल तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा. परिणामी लाखो अमेरिकन नागरिक ट्रंम्प सरकारविरोधात रस्त्यावर उतरले.
![]() |
| जॉर्ज फ्लॉईड |
बीबीसीच्या माहितीप्रमाणे, 2019 मध्ये अमेरिकेच्या अधिकृत जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचं (कृष्णवर्णीय) प्रमाण 14 टक्क्यांपेक्षाही कमी होतं. पण ज्या लोकांना पोलिसांनी गोळी झाडून ठार केलं होतं, अशांमध्ये आफ्रिकन अमेरिकनांचं प्रमाण मात्र 23 % पेक्षाही जास्त आहे. आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ठार केलंय.
ब्रायन स्टेवन्सनबद्दल..
ब्रायन स्टेवन्सनने आपल्या कामाचा विस्तार होण्यासाठी तसेच अनेक वकीलांचा समावेश करून घेण्यासाठी 'इक्वल जस्टीस इनिशिएटीव्ह' नावाची एनजीओ सुरू केली. अमेरिकेतल्या अलाबामा शहरामध्ये ही संस्था कार्यरत आहे. ब्रायन संस्थेचा प्रमुख आहे. तसेच न्युयॉर्कच्या लॉ स्कुलमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करतो. त्याने आतापर्यंत अनेक निर्दोष कैद्यांची सुटका केली आहे. ब्रायनने अमेरिकन व्यवस्थेला दाखवून दिलं की, वर्णद्वेष आणि राजकारणाचे बळी म्हणून गरिबांना अडकवण्यात येते. त्याच्या कामाप्रति त्याला अनेक सन्मान मिळाले आहेत.
प्रसिद्ध वकील ब्रायन स्टेवन्सन हा निर्दोष आरोपी वॉल्टरची केस कशाप्रकारे हँडल करतो, त्यामध्ये त्याला आलेले यश अपयश हे पाहण्यासाठी चित्रपट बघण्यासारखा आहे. (नोट - हा चित्रपट अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर पाहता येईल)
"I came out of law school with grand ideas in my mind about how to change the world. But Mr. Walter made me realize we can't change the world with only ideas in our mind. We need conviction in our hearts. This man taught me how to stay hopeful. Because I now know the hopelessness is the enemy of justice."- Bryan Stevenson




सूचनांचे स्वागत
ReplyDelete