'द ग्रेट इंडियन किचन'
आपला दिवस कसा निघून जातो? हे कळत नाही. पण त्या कालावधीत जर पदोपदी अन्याय होत असेल तर ‘कळतच नाही’ हे उत्तर अपेक्षीत नाही. काही स्त्रिया उच्चशिक्षण घेऊनही रांधा, वाढा अन् उष्टी काढा अशी काम करतात. तेव्हा कळत त्याग आणि संयम शब्दाचा अर्थ. ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा मल्याळम भाषेतील 100 मिनिटांचा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शीत झाला आहे. शबरिमाला मंदिरात महिलांचा प्रवेश या तथाकथीत वादग्रस्त विषयामुळे हा चित्रपट तब्बल तीन महिने लांबणीवर पडला होता. लेखक आणि दिग्दर्शक जोयो बेबी यांनी चित्रपट दिग्दर्शीत केला असून, अभिनेता सुरज वेंजरमुडू आणि अभिनेत्री निमीशा सजयन यांनी मुख्य भूमीका पार पाडली आहे. आयएमडीबी रेंटी 8.4 असलेला हा चित्रपट शांघाई फिल्म महोत्सव 2021 साठी निवडला गेला आहे. क्रांतिकारक चे गवेराच्या पोस्टरने क्रांती आणि प्रतिक्रांतीचा समाजातील वावर दिग्दर्शकाने चित्रपटात दाखवला आहे. सगळ्या प्रथा-परंपरा, सण-उत्सव, धार्मीक कार्यक्रम महिलांच्याच मुळावर का? हा प्रश्न चित्रपट पाहून झाल्यावर पडतो.
पुरुष घरात वेगळ्याच अॅटिट्यूड ने वागत असतो, तर बाहेर वेगळ्याच अॅटिट्यूडने. तो कायम समाजामध्ये आपल्या इमेजला धक्का लागणार नाही असं वागत असतो. घरात मात्र बायकांसमोर फुकटची मर्दानगी दाखवत असतो. हा चित्रपट पुरुषांनी तर आवर्जून बघायला हवा.
Comments
Post a Comment